धुळे - साक्रीचे आमदार धनाजी अहिरे यांच्या वाहनाच्या धडकेत २ भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर साक्री येथील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी त्यांनी अहिरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
अपघातानंतर साक्री ग्रामस्थांचा रास्ता रोको; आमदार अहिरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदार संघाचे आमदार डी. एस. अहिरे यांच्या वाहनाच्या धडकेत शांताराम दयाराम सोनवणे आणि सोनू दयाराम सोनवणे या दोघा भावांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर येथील वाहने क्रेनच्या सहाय्याने उचलण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ग्रामस्थांनी विरोध केला. यावेळी साक्री ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत आमदार अहिरे यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

अपघतामध्ये मृत सोनवणे बंधुंच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी यावेळी केली. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळासाठी विस्कळीत झाली होती.