धुळे - भाजप युवा मोर्चाचे धुळे शहरातील पदाधिकारी रोहित चांदोडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. त्यांनी लिहिलेले ते पत्र सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. या पत्रातून रोहित चांदोडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध प्रश्नांबाबत विचारणा केली असून, आपली मते कळवली आहेत.
धुळ्यातील रोहित चांदोडे या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र... हेही वाचा... 'बोलायचे एक आणि करायचे एक यामुळेच भाजप विरोधी बाकावर'
निवडणूकच्या पूर्वी भाजपसोबत केलेली युती तोडत, शिवसेनेने आघाडीतील पक्षांसोबत सरकार स्थापन केले. याबाबत चांदोडे यांनी आपल्या पत्रात लिहिले असल्याचे म्हटले आहे. त्यात, 'हिंदुत्ववादी विचारसरणीसोबत शिवसेनेने प्रतारणा केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आपण व्यक्तिगतरित्या व्यथित झालो' असल्याचे रोहित चांदोडे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले आहे.
हेही वाचा... 'डॉ. आंबेडकरांचे स्मारक पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण ठरल्याशिवाय राहणार नाही'
मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना राम मंदिराचा विसर पडला आहे. सावरकरांचा अपमान झाला तरीही त्याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला गेला नाही. या सर्व विषयांबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्रातून कळवले असल्याचे चांदोड यांनी म्हटले आहे. तसेच या पत्राला माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर देतील अशी आपल्याला अपेक्षा असल्याचे रोहित चांदोडे यांनी म्हटले आहे.