धुळे - शहरातील आग्रा रोड भागातील राम मंदिरात रामनवमीचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान, धुळे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांनी यावेळी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले.
धुळ्याच्या आग्रा रोड भागातील राम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा - कुणाल पाटील
संपूर्ण राज्यात आणि देशात आज रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. धुळे शहरातील आग्रा रोड भागातील पट्टभिषिक्त श्रीराम मंदिरातही रामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. रामनवमीनिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. दरम्यान, आज रामनवमीच्या दिवशी दुपारी रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
संपूर्ण राज्यात आणि देशात आज रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. धुळे शहरातील आग्रा रोड भागातील पट्टभिषिक्त श्रीराम मंदिरातही रामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. रामनवमीनिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसेच या मंदिरात चैत्र नवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आज रामनवमीच्या दिवशी दुपारी रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता महाआरती करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी धुळे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांनीही कार्यकर्त्यांसोबत दर्शन घेऊन विजयी करण्याची प्रार्थना केली. रामनवमी उत्सवानिमित्त मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.