धुळे- विधानसभा निवडणुकीत आपल्याला दिलेल्या जागांवर आपण समाधानी आहोत, दुसरा पर्याय नसल्याने आम्हाला पाच जागांवर समाधान मानावे लागले, असल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या पाच जागांवर आपण समाधानी - रामदास आठवले - Ramdas athawale
युतीतील विधानसभेसाठी झालेल्या जागावाटपांवर आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज (सोमवार) धुळे दौऱ्यावर आले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यावेळी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी महायुतीच्या जागावाटपात मित्रपक्षांना कमी जागा मिळाल्यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. रामदास आठवले यांनी आपल्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे दिलेल्या पाच जागांवर आपण समाधानी असून यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
हेही वाचा - सुरत-नागपूर महामार्गावर तिहेरी अपघात, 1 ठार