महाराष्ट्र

maharashtra

धुळे शहरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअस वर पोहोचला होता. आज दुपारी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

By

Published : Jun 11, 2019, 6:23 PM IST

Published : Jun 11, 2019, 6:23 PM IST

धुळे शहरात पावसाची हजेरी

धुळे- शहरासह परिसरात आज दुपारी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी उकाड्यात मात्र प्रचंड वाढ झाली आहे.

धुळे शहरात पावसाची हजेरी
गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअस वर पोहोचला होता. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. अखेर आज दुपारी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू होताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला. सोसाट्याचा वारा आणि त्यानंतर सुरू झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. पहिल्या पावसाचा काही बाल गोपालांनी आनंद देखील लुटला.

ABOUT THE AUTHOR

...view details