धुळे - शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी द्यावी, पीक विम्याची रक्कम तातडीने देण्यात यावी, शेतीच्या सर्व कामांचा समावेश मनरेगात करण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही प्रहारने दिला आहे.
धुळ्यात विविध मागण्यांसाठी प्रहारचे जेलभरो आंदोलन
शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी द्यावी, पीक विम्याची रक्कम तातडीने देण्यात यावी, शेतीच्या सर्व कामांचा समावेश मनरेगात करण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही प्रहारने दिला आहे. आंदोलनाला माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पाठिंबा दिला होता.
आंदोलकांच्या इतर मागण्यांमध्ये दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ केले जावे, ओबीसींसाठी स्वतंत्र घरकुल योजना करून आर्थिक तरतूद करावी, आदिवासींचे प्रलंबित वनहक्क, जमीन पट्टे त्वरित वाटप करावे आदींचा समावेश आहे.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने, धुळे जिल्हाधिकारी कार्यलयसमोर निदर्शने करून अप्पर जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यानंतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनाला माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पाठिंबा दिला होता.