धुळे- लोकसभा मतदारसंघातील प्रचार आज थंडावला असून उमेदवारांनी आता प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर दिला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून मतदानाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात किती टक्के मतदान होते आणि याचा फायदा नेमका कुणाला होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला; धुळ्यात २९ एप्रिलला मतदान
धुळे लोकसभा मतदारसंघातून १९ लाख ४ हजार ८५९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजवणार आहेत. सोमवारी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २९ एप्रिलला शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. आज, २७ एप्रिल रोजी प्रचाराची रणधुमाळी संपली आहे. प्रचार थंडावल्यानंतर आता उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटी देण्यास सुरुवात केली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली असून धुळे लोकसभा मतदारसंघात १ हजार ९४० मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघातून १९ लाख ४ हजार ८५९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजवणार आहेत. सोमवारी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघासाठी किती टक्के मतदान होत आणि याचा फायदा नेमका कुणाला होतो हे बघणे महत्वाचे असणार आहे.