धुळे - काही दिवसांपूर्वी सोनगीर पोलिसांनी दारुचा मोठा साठा पकडत दारूची मोठी कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान लाखो रुपयांची वेगवेगळ्या कंपन्यांची देशी व विदेशी कंपनीच्या दारूसाठ्यासह पोलिसांनी काही संशयितांनादेखील ताब्यात घेतले होते.
धुळे: चाळीसगाव रोड परिसरातील दारुच्या गोडाऊनवर पोलिसांचा छापा - illegal liqure stock in Dhle
धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांनी दारू साठा तयार करणाऱ्या गोडाऊनवर छापा टाकला असून याठिकाणी दारू तयार करणार साहित्य जप्त केले आहे.
या संशयितांची तपासणी केली असता त्यांच्याकडून चाळीसगाव रोड परिसरामध्ये दारूसाठा करण्यासाठी गोडाऊन असल्याची कबुली दिल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संशयितांनी दिलेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला.
या छाप्यामध्ये एक गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कंपनीच्या दारूचे बॉक्सेस व रिकाम्या बाटल्या त्याचबरोबर झाकण आणि दारूच्या बाटल्या सील कारण्याचे मशिन पोलिसांना आढळून आले आहे. या कारवाईनंतर पाच जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून विचारपूस करून मोठं रॅकेट यामागे असण्याचा संशय धुळे पोलिसांना असून यासंदर्भात पुढील तपास धुळे पोलिस करीत आहेत.