धुळे- जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसानंतर जामखेली धरणातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. तर हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पांझरा नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी रात्रभर आणि रविवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे जामखेली धरणातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. तर हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी रात्रभर आणि रविवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे साक्री तालुक्यातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील विविध जलप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा निर्माण झाला. पांझरा नदीवरील मध्यम प्रकल्प तसेच जामखेली धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा निर्माण झाला असून हा पाणीसाठा रविवारी पांझरा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला.
यावेळी तब्बल १२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदीपात्रात करण्यात आला. तर हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच गर्दी पांगवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.