धुळे- शहरातील हिरे रूग्णालयातील प्रयोगशाळेत प्रलंबित ३० पैकी २९ अहवाल सोमवारी सायंकाळपर्यंत निगेटीव्ह आले आहेत. यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
धुळ्यातील हिरे रूग्णालयातील प्रयोगशाळेत प्रलंबित ३० पैकी २९ अहवाल सोमवारी सायंकाळपर्यंत निगेटीव्ह आले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील व्यक्ती तसेच हिरे महाविद्यालयाच्या काही डॉक्टरांचा यात समावेश असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील चार रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २० एप्रिलपासून दररोज बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. २० एप्रिल ते २६ एप्रिल या आठवडाभरात जिल्ह्यात २४ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तर १० एप्रिलला जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता.
धुळ्यात २९ जणांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह, जिल्ह्यात २४ रुग्ण
धुळ्यातील हिरे रूग्णालयातील प्रयोगशाळेत प्रलंबित ३० पैकी २९ अहवाल सोमवारी सायंकाळपर्यंत निगेटीव्ह आले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील व्यक्ती तसेच हिरे महाविद्यालयाच्या काही डॉक्टरांचा यात समावेश असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
धुळ्यात २९ जणांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह, जिल्ह्यात २४ रुग्ण
देशासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोबतच मृतांचा आकडादेखील वाढत आहेत. क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह येणे, ही एवढी चिंतेची बाब नाही. मात्र, मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह येणे किंवा अचानक खूप मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे.