महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने काढली हेल्मेटची अंत्ययात्रा - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस प्रशासनाने नागरिकांना हेल्मेट सक्ती केली आहे. नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हेल्मेट सक्ती करण्यात आल्याने स्थानिकांकडून निर्णयाला विरोध करण्यात येत आहे

हेल्मेट सक्ती विरोधात आंदोलन

By

Published : Feb 8, 2019, 1:14 PM IST

धुळे - रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र, या हेल्मेटसक्तीला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून विरोध करण्यात आला. यावेळी त्यांच्याकडून शहरात हेल्मेटची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस प्रशासनाने नागरिकांना हेल्मेट सक्ती केली आहे. नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हेल्मेट सक्ती करण्यात आल्याने स्थानिकांकडून निर्णयाला विरोध करण्यात येत आहे. शिवाय राजकीय नेत्यांकडूनही या निर्णयाला विरोध करण्यात येत आहे. हेल्मेट सक्ती राष्ट्रीय महामार्गावर करणे गरजेचे आहे, मात्र ती शहरात केली जावू नये. यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत असल्याची राजकीय पक्षांची भूमिका आहे.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने शहरातून हेल्मेटची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. आंदोलनकर्त्यांकडून वाहतूक पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. दरम्यान, प्रतिकात्मक अंत्ययात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details