धुळेMolestation Case Against Police Officer :शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर हेमंत पाटील यांना पकडण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी तीन पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत; (Dhule Crime) परंतु पोलिसांच्या हाती अजून ते लागलेले नाहीत. प्रकरण घडल्यानंतर हेमंत पाटील हे विनापरवानगी रजा टाकून निघून गेले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकारांना दिली. हेमंत पाटील यांच्या विरोधात धुळे शहरात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्षपातीपणे चौकशी केली जाणार असल्याचंही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं.
पोलीस अधिकाऱ्याचा महिलेला अश्लील कॉल:पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, "धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंतकुमार प्रभाकर पाटील (हल्ली नेमणूक नंदुरबार जिल्हा) यांनी सन 2022 पासून ते 11 नोव्हेंबर 2023 पावतो पीडित महिलेकडं शारीरिक सुखाची मागणी केली. अश्लील वक्तव्य करुन मोबाईल व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल करुन पीडित महिलेस त्रास दिला. सांगितल्याप्रमाणं न केल्यास तुझी समाजात बदनामी करेल, त्याचप्रमाणं वेळोवेळी व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल करुन, नग्न अवस्थेत व्हिडिओ रेकॉर्ड करुन न पाठवल्यास ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत कुठं वाच्यता केली असता पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकीही दिली" असं त्यांनी यावेळी सांगितलं.