महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे: 12 वर्षीय चिमुकलीवर 42 वर्षीय नराधमाचा अत्याचार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न - गोंदूर रोड

हे प्रकरण दडपण्यासाठी नराधमाच्या कुटुंबीयांकडून पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जात आहे. मात्र याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांनी केली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Sep 22, 2019, 11:29 PM IST

Updated : Sep 22, 2019, 11:41 PM IST

धुळे - शहरातील गोंदूर रोड परिसरात राहणाऱ्या एका 12 वर्षीय चिमुकलीवर नवलाने परिसरातील एका 42 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरातील गोंदूर रोड परिसरात राहणाऱ्या एका 12 वर्षीय चिमुकलीवर नवलाने येथील बापू सोमा हातगिर या नराधमाने तीन महिन्यांपूर्वी वेळोवेळी अत्याचार केले होते. मात्र, भीतीपोटी चिमुकलीने आपल्या कुटुंबीयांना काहीही सांगितले नाही. गेल्या काही दिवसांपासून तिला पोटदुखीचा त्रास होत होता. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे समजताच तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

हेही वाचा - डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू, कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी

याप्रकरणी बापू सोमा हातगिर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र, हे प्रकरण दडपण्यासाठी नराधमाच्या कुटुंबीयांकडून पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जात आहे. आम्ही तुम्हाला संपत्ती देतो, पैसे देतो, अशा प्रकारचे आमिष दाखवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र याप्रकरणी बापू सोमा हातगिर याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांनी केली आहे. पीडित चिमुकलीवर सध्या धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - धुळ्यात लाचखोर मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात

Last Updated : Sep 22, 2019, 11:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details