महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहीद जवान मनोहर पाटील यांच्या पार्थिवाववर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

‘अमर रहे…, अमर रहे… शहीद जवान मनोहर पाटील… अमर रहे…’च्या घोषात बुधवारी धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे पांझरा नदीच्या काठावर शहीद जवान मनोहर पाटील Military Jawan Manohar Patil यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.

Jawan Manohar Patil
Jawan Manohar Patil

By

Published : Sep 7, 2022, 10:29 PM IST

Updated : Sep 7, 2022, 10:48 PM IST

धुळे‘अमर रहे…, अमर रहे… शहीद जवान मनोहर पाटील… अमर रहे…’च्या घोषात बुधवारी धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे पांझरा नदीच्या काठावर शहीद जवान मनोहर पाटील Military Jawan Manohar Patil यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. सियाचीन ग्लेशियर याठिकाणी ऑपरेशन मेघदूतमध्ये सेवा बजावत असतांना 16 जुलै 2022 या दिवशी तेथील हवामानाच्या दुष्परिणामांमुळे त्यांना तीव्र डोके दुखी, उलटीचा त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारार्थ त्यांना हेलिकॉप्टर ने 403 फिल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. या ठिकाणी उपचार सुरू असतांना जवान मनोहर रामचंद्र पाटील यांची 5 सप्टेंबरच्या सायंकाळी 5:22 वाजता प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव हवाई मार्गे पुणे येथे आणण्यात आले. त्यानंतर तेथून रुग्णवाहिकेतून त्यांच्या न्याहळोद या मूळ गावी आणण्यात आलं. बुधवारी न्याहळोद येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शहीद मनोहर पाटील यांची 11 वर्षीय कन्या तनिष्का हिने वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

ग्रामस्थांनी वाहिली श्रद्धांजलीऑपरेशन मेघदूत अंतर्गत सियाचीन ग्लेशियर येथे कार्यरत हवालदार मनोहर रामचंद्र पाटील यांना 16 जुलै 2022 रोजी तीव्र डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सैन्य दलाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचा 5 सप्टेंबर 2022 रोजी प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी न्याहळोद येथे आणण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेवून ‘अमर रहे…, अमर रहे…शहीद जवान मनोहर पाटील..अमर रहे’सह भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणा देत होते. हवालदार मनोहर पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर खासदार डॉ. सुभाष भामरे, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, धुळे ग्रामीणच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे, सैन्य दलातर्फे कॅप्टन प्रतिक चिटणीस, संजयकुमार, सोनगीर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील, सैनिक कल्याण संघटक रामदास पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले आहे.

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

हवेत गोळीबाराच्या तीन फैरीपोलिस दल आणि सैन्य दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या 3 फैरी झाडत मानवंदना दिली. माजी सैनिकांनीही शहीद जवान मनोहर पाटील यांना अभिवादन केले. शहीद मनोहर पाटील यांची 11 वर्षीय कन्या तनिष्का हिने वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. तिने मनोगत व्यक्त करताना सांगितले की, देशाच्या सीमांची सुरक्षा करताना माझे वडील शहीद झाले. त्यांचा मला अभिमान आणि गर्वही आहे. कन्या म्हणून मी त्यांचे भूषण होते. त्याबद्दल ते नेहमी बोलत असत. Military Jawan Manohar Patil Cremated With Full Military Honours In Dhule District

स्मारकासाठी खासदार निधीतून 10 लाखाचा निधी माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. भामरे यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी सांगितले, शहीद जवान मनोहर पाटील यांचे कार्य अतुलनीय होते. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. न्याहळोद येथे त्यांच्या स्मारकासाठी खासदार निधीतून 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, संजीवनी शिसोदे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे आदींनी शहीद जवान मनोहर पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक,लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Last Updated : Sep 7, 2022, 10:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details