धुळे -जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या बंडखोर उमेदवार मंजुळा गावित यांचा 7 हजार 494 मतांनी विजय झाला आहे. मंजुळा गावित यांच्या विजयामुळे साक्री विधानसभा मतदारसंघात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे.
साक्री विधानसभा मतदारसंघात भाजपच्या बंडखोर मंजुळा गावित विजयी - महाराष्ट्र इलेक्शन रिजल्ट
धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार आणि धुळे महानगरपालिकेचे माजी महापौर मंजुळा गावित यांचा दणदणीत विजय झाला आहे. मंजुळा गावित यांच्यासमोर भाजपचे मोहन सूर्यवंशी तर काँग्रेसचे डी. एस अहिरे यांचं आव्हान होतं.
हेही वाचा-यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या नेत्यांची बंडखोरी सपशेल फेल
धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार आणि धुळे महानगरपालिकेचे माजी महापौर मंजुळा गावित यांचा दणदणीत विजय झाला आहे. मंजुळा गावित यांच्यासमोर भाजपचे मोहन सूर्यवंशी तर काँग्रेसचे डी. एस अहिरे यांचं आव्हान होतं. मात्र, मंजुळा गावित यांचा 7 हजार 494 मतांनी विजय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंजुळा गावित या भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी डावलले गेल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली होती. मात्र, अटीतटीच्या लढाईत मंजुळा गावित यांचा विजय झाला आहे. त्यांच्या विजयानंतर साक्रीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.