महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 8, 2019, 11:38 PM IST

ETV Bharat / state

बापरे..! धुळ्यात लस्सीमध्ये आढळली अळी, मालकाकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

याबाबत धुळे जिल्हा अन्न व प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. तर या प्रकाराबाबत मालकाला विचारल्यास त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली.

ळ्यात लस्सीमध्ये आढळली अळी

धुळे- जिल्ह्यातील शिरपूरमधील परदेशी आइस्क्रीम सेंटर मधील लस्सीत अळी निघाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, याबाबत परदेशी आईस्क्रीम मालकाने पुरावे नष्ट केल्याने मोठा गदारोळ झाला. त्यामुळे तक्रारदार नगरपालिका व अन्न सुरक्षा विभागाला तक्रार करणार आहेत.

ळ्यात लस्सीमध्ये आढळली अळी

हेही वाचा -कौतुकास्पद! प्रवाशाचे लाखोंचे दागिने रिक्षाचालक भरतने केले परत

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरपूर येथील भंडारी टॉकीजच्या बाजुला असलेल्या परदेशी आइस्क्रीम येथे रविवारी सायंकाळी अमोल राजपूत व जितू राजपूत गेले होते. त्यावेळी तेथे त्यांनी 2 लस्सी मागितल्या. त्यातील एका लस्सीमध्ये अळी असल्याचे अमोलच्या लक्षात आले. त्यावेळी अमोलने आइसक्रीम मालकाला याबाबत सांगितले असता, मालकाने उडवा-उडवीची उत्तरे देत ग्लास हिसकावून घेत लस्सी फेकून दिली. याबाबतचे चित्रीकरण अमोल राजपूत यांनी आपल्या मोबाईलमध्ये केले आहे.

हेही वाचा -काबूल हल्ल्यानंतर ट्रम्प यांची अमेरिका-तालिबान शांतता चर्चेतून माघार

याबाबत धुळे जिल्हा अन्न व प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. तर या प्रकाराबाबत मालकाला विचारल्यास त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. याअगोदर देखील शहरातील करवंद नाका भरकादेवी आईस्क्रीम येथे असा प्रकार घडल्याने हेमंत चौधरी यांनी अन्न व प्रशासन विभागाकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर अद्याप कारवाई झाली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details