धुळे - योगाचे महत्व शारिरीक दृष्ट्या ( The importance of yoga ) किती फायदेशीर आहे. हे आता अवघ्या जगाला कळल्यामुळे २१ जून हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून साजरा होत असतो. या जागतिक योगा दिनाच्या पूर्व संध्येला धुळे शहरातील क्रीडा संकुलात असलेल्या जलतरण तलाव येथे वॉटर योगाचे आयोजन ( Organizing water yoga ) करण्यात आले होते .
International Yoga Day 2022 : धुळ्यात पाण्यातील शीर्षासन पाहून जिल्हाधिकारी झाले थक्क; पाहा, वॉटर योगा
पाण्यात अर्थात जलतरण तलावात जेष्ठ नागरिकांनी धुळ्यात जागतिक योग दिनाच्या पूर्व संध्येला वॉटर योगा ( Water yoga in dhule ) केला. यात पाण्यातील शीर्षासन ( Water headrest ) पाहून त्या ठिकाणी उपस्थित असलेले धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा देखील आवक झाले.
योगा करून लोकांचे लक्ष वेधले -या वॉटर योगासाठी जेष्ठ नागरिकांची संख्या अधिक होती. या वॉटर योगाच्या कार्यक्रमास धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा आवर्जून उपस्थित होते. त्यांनी देखील योगाचे महत्व उपस्थितांना सांगितले . यावेळी पाण्यात जेष्ठ नागरिक वेगवेगळे योगा करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, लक्षवेधी ठरले ते पाण्यातील शीर्षासन, हे शीर्षासन पाहून जिल्हाधिकारी देखील आवक झाले . त्यांनी ते शीर्षासन करणाऱ्यांचे कौतुक केले. वॉटर योगा करणारे सदस्य जेष्ठ नागरिक असले तरी, ते नियमित वॉटर योगा करतात. योगा केल्यास आपली प्रतिकार शक्ती वाढते, मन प्रसन्न राहते, टेन्शन फ्री होते, असे एक ना अनेक फायदे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.