महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुन्हा नकोशी..! नदी किनारी सापडले स्त्री जातीचे अर्भक - girl child

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात वर्षी गावालगतच्या सूर नदीच्या पुलाखाली स्त्री जातीचे अर्भक आढळून आले आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत अर्भकाला रुग्णालयात दाखल केले आहे.

स्त्री जातीचे अर्भक

By

Published : Jul 1, 2019, 4:12 PM IST

धुळे- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात वर्षी गावालगतच्या सूर नदीच्या पुलाखाली स्त्री जातीचे अर्भक आढळून आले आहे. शेतात काम करणाऱ्या मजूरांना पुलाखाली लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. या ठिकाणी एका गोणपाटात लहान मुल असल्याचे मजुरांना दिसून आलं. नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक रक्ताने आणि राखेने माखलेले आढळले. मजूरांनी गोणपाटात असलेल्या या अर्भकाला तात्काळ बाहेर काढलं. तसेच त्यांनी ही गोष्ट सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिली.

स्त्री जातीचे अर्भक
शिंदखेडा पोलिसांना अर्भक सापडल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच पोलीस पाटील किरण सिंग राजपूत यांच्याशी संपर्क साधून त्यांना यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतीने या अर्भकाला जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले असून अर्भकाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details