धुळे- जिल्ह्यातील शिरपूर येथे अवैधरित्या बिअरची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील गोल्ड रिफायनरी समोर ही कारवाई करण्यात आली.
धुळे: बियरच्या खोक्यासह १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - धुळे
इंदोरकडून येणाऱ्या ट्रकमधून विनापरवाना बिअरचे खोक्यांची वाहतूक केली जात होती. यावेळी शिरपूर-शहादा रस्त्यावर गोल्ड रिफायनरीसमोर ट्रक अडवण्यात आला.
जप्त केलेली बिअर
इंदोरकडून येणाऱ्या ट्रकमधून विनापरवाना बिअरचे खोक्यांची वाहतूक केली जात होती. यावेळी शिरपूर-शहादा रस्त्यावर गोल्ड रिफायनरीसमोर ट्रक अडवण्यात आला. या ट्रकची तपासणी केली असता बिअरचे ५०० खोके तसेच बिअरच्या २४ कॅन आढळून आल्या. जवळपास १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वाहनचालकासह २ जणांना अटक करण्यात आली.