महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे : कौटुंबीक वादातून पतीने केली पत्नीची हत्या - shivaji khairnar

साक्री तालुक्यात कौटुंबीक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मारेकरी शिवाजी खैरनार याला पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे.

धुळे: कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या

By

Published : Jun 17, 2019, 11:09 PM IST

धुळे - साक्री तालुक्यात कौटुंबीक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी घडली असून या घटनेमुळे साक्री तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मारेकरी शिवाजी खैरनार याला पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे.


जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील विटाई गावात राहणाऱ्या किरणबाई खैरनार आणि शिवाजी खैरनार यांच्यात कौटुंबीक वादातून नेहमीच भांडणे होत असत. मात्र सोमवारी हा वाद विकोपाला गेला आणि शिवाजी याने संतापाच्या भरात किरणबाई यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.


रॉडने वार केल्यानंतर किरणबाई शिवाजी खैरनार या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. आपला जीव वाचविण्यासाठी त्या आरडाओरड करत होत्या. मात्र ही भांडणे नेहमीचीच असल्याने शेजाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. किरणबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असताना देखील शिवाजी वार करत होता.


घटनेनंतर शिवाजी खैरनार आणि अन्य २ जण घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी शिवाजी खैरनार याची माहिती ग्रामस्थांकडून घेतली आणि त्याच्या नातेवाईकांसह इतर ठिकाणी पथके रवाना केली. घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी शिवाजी खैरनार याला अटक केली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details