धुळे - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज (मंगळवार दि.२८) जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के लागला असून यामध्ये मुलींनी सर्वाधिक यश प्राप्त केले आहे.
धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के; यंदाही मुलींनी मारली बाजी - education
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के इतका लागला.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के इतका लागला. यात सर्वाधिक मुलींनी बाजी मारली आहे. धुळे जिल्ह्यातून यंदा २४ हजार १९३ विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २० हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी विविध ठिकाणी सोय करण्यात आली होती. धुळे जिल्हा युवासेनेच्या वतीने १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निकाल बघण्याची सोय करण्यात आली होती. युवासेनेच्या वतीने निकालाची मोफत प्रतही देण्यात आली.