धुळे -शहरासह परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. तब्बल महिन्याभराच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसाने नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडालेली पाहायला मिळाली.
धुळे: शहरासह परिसरात पावसाची दमदार हजेरी, नागरिकांना दिलासा - dhule
मागील अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या धुळेकरांना शनिवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावत सुखद दिलासा दिला आहे.
धुळे शहरात पावसाची हजेरी
मागील अनेक दिवसांपासून धुळेकर पावसाच्या प्रतीक्षेत होते. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. हा पाऊस आता कायम रहावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी प्रार्थना धुळेकर करत आहेत.