धुळे - शहरासह परिसरात गुरुवारी दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली. तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसाने नागरिकांना दिलासा दिला आहे.
१५ दिवसांच्या विश्रांतीनंतर धुळे शहरात पावसाची दमदार हजेरी
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या धुळेकरांना गुरुवारी दुपारी पावसाने दमदार हजेरी लावत सुखद दिलासा दिला आहे.
धुळे शहरात पावसाने दमदार हजेरी लावली
गेल्या अनेक दिवसांपासून धुळेकर पावसाच्या प्रतीक्षेत होते. शहरासह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर गायब झालेला पाऊस आज पुन्हा बरसला आणि या झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला आहे. यामुळे सुरू झालेला पाऊस आता कायम रहावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी प्रार्थना केली जात आहे. या पावसाचा आबालवृद्धांनी आनंद लुटला.