धुळे- शहरातील जमनागिरी रोड वरील शासकीय धान्य गोदामाला रविवारी सायंकाळी आग लागली. या आगीत गोदामाचे काही प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शासकीय धान्य गोदामाला आग, जीवितहानी नाही - धुळे बातमी
धुळे शहरातील जमनागिरी रोड भागात धान्य गोदाम आहे. या गोदामाला रविवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग आटोक्यात आणली.
शासकीय धान्य गोदामाला आग...
धुळे शहरातील जमनागिरी रोड भागात शासकीय धान्य गोदाम आहे. या गोदामाला रविवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग आटोक्यात आणली. या आगीत गोदामाचे काही प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, आगीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.