धुळे -जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. स्फोटात आतापर्यंत १५ कर्मचारी ठार झाले असून ४८ जण जखमी त्यातील १८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
धुळे: स्फोटाच्या पाहणीसाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल हेही वाचा - धुळे केमिकल कंपनीच्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ एका केमिकल कंपनीत शनिवारी भीषण स्फोट झाला या स्फोटामुळे कंपनीचा कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना आता या स्फोटाची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. ही टीम घटनास्थळी पाहणी करून त्याचा अहवाल सादर करणार आहे. या अहवालातून नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा - धुळ्याच्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट; १५ ठार, 65 गंभीर
हेही वाचा - दोषींवर कठोर कारवाई करणार - पालकमंत्री भुसे