धुळे - एकविरा देवीच्या यात्रा उत्सवाला धुळ्यात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यातून भाविक यात्रेसाठी आले आहेत. महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ म्हणून एकविरा देवीला ओळखले जाते.
एकविरा देवी यात्रा उत्सवाला सुरुवात, राज्यभरातून भाविकांची गर्दी - yatra
यावेळी भाविकांनी नवस फेडण्यासाठी तसेच जावळ काढण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.एकविरा देवी मंदिरात चतुर्दशनिमित्त महाराष्ट्रासह अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
यावेळी भाविकांनी नवस फेडण्यासाठी तसेच जावळ काढण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.एकविरा देवी मंदिरात चतुर्दशनिमित्त महाराष्ट्रासह अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. मंदिर परिसरात यात्रेनिमित्त विविध प्रकारची दुकाने थाटली आहेत. तसेच, विविध प्रकारचे पाळणे देखील दाखल झाले आहेत. यावेळी एकविरा देवीची विधिवत पूजा करून यात्रोत्सवाला सुरुवात झाली.
चैत्र पौर्णिमेला एकविरा देवीची धुळे शहरातून पालखी मिरवणूक काढली जाते. मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रोत्सवाची तयारी मंदिर प्रशासनाने पूर्ण केली असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.