महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्याच्या राजकारणात अनिल गोटेंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत धुळे विधानसभा मतदारसंघातून कोण विजयी होणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार अनिल गोटे यांना दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला जास्तीत जास्त जागा मिळतात का, हे बघणं देखील महत्त्वाचे असणार आहे. असे मत राजकीय विश्लेषक डॉ. अभिनय दरवडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे.

अनिल गोटे

By

Published : Sep 19, 2019, 9:12 AM IST

धुळे -अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत धुळे विधानसभा मतदारसंघातून कोण विजयी होणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार अनिल गोटे यांना दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला जास्तीत जास्त जागा मिळतात का, हे बघणs देखील महत्त्वाचे असणार आहे, असे मत राजकीय विश्लेषक डॉ. अभिनय दरवडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे.

धुळ्याच्या राजकारणात अनिल गोटेंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला आता सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येकजण विजय आपलाच होणार असल्याचे सांगत आहे. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांप्रमाणेच धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. भाजप-शिवसेना विरुद्ध आघाडी अशी लढत राहणार असून 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपने 2 तर काँग्रेसने 3 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढल्यास मतदार कोणाला कौल देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकीकडे धुळे शहराचे आमदार अनिल गोटे हे शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे भाजपने देखील तयारी सुरू केली आहे. अनिल गोटे हे कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे. यामुळे अनिल गोटे यांना दुर्लक्षित करून चालणार नाही, असे मत राजकीय विश्लेषक डॉ. अभिनय दरवडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details