धुळे - तीन फूट उंचीचा नवरदेव व चार फूट उंचीची वधू यांचा अनोखा विवाह शिरपूर तालुक्यात भरवाडे येथे पार पडला आहे. हा विवाह सोहळा शासनाच्या नियमांचे पालन करीत पार पडला असून धुळे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
तीन फूट उंचीचा नवरदेव व चार फूट उंचीची वधू यांचा अनोखा विवाहसोहळा - dhule news
लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत, सोशल डिस्टन्स पाळत झांबरू आणि नयनाबाई यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या अनोख्या विवाहाचे ग्रामीण भागात मोठे कौतुक होत आहे.
विविध क्षेत्रातून आपल्या कलेने अनेकांची मने जिंकणारा आणि लोकांना आकर्षित करणारा भरवाडे येथील तीन फूट उंची लाभलेला २९ वर्षीय झांबरु राजेंद्र कोळी आणि चार फूट उंची लाभलेली कुरखळी येथील १९ वर्षीय कुमारी नयना कैलास कोळी यांचा अनोखा विवाह तालुक्यातील टेंभे येथे तापी काठी जोगाई माता मंदिरात लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत पार पडला.
झांबरू कोळी आणि नयना यांची मने जुळली. विवाहाची तारीखही निश्चित झाली. परंतु रेशीमगाठी जुळवून येण्या अगोदरच कोरोना विषाणुचा फैलाव झाला. बघता बघता अवघ्या देशात लॉकडाऊन झाला. संपूर्ण जग थांबले. अशा परिस्थितीत लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत, सोशल डिस्टन्स पाळत झांबरू आणि नयनाबाई यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या अनोख्या विवाहाचे ग्रामीण भागात मोठे कौतुक होत आहे.