धुळ्यात राष्ट्रवादीकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध - पुलवामा हल्ला
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४५ जवान शहीद झाले आहेत. उरीपेक्षा सर्वात मोठा हल्ला आहे. या घटनेचा संपूर्ण देशात निषेध करण्यात येत आहे. संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी केली जात आहे.
पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
धुळे - शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सरकारने हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.