धुळे- तालुक्यातील चौगाव शिवारात शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. शनिवारी संध्याकाळी एका शेतविहिरीत बिबट्याचे ३ महिन्यांचे पिल्लू पडले होते.
३ महिन्यांच्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश - bibtya
तालुक्यातील चौगाव शिवारात शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.
याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गावातील लोकांनी कळविले असता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. बिबट्याच्या पिल्लास बाहेर काढण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.अखेर आज बिबट्याच्या पिल्लास बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले आहे. या बछड्याची आई देखील परिसरातच असल्याने पिंजरा लावण्यात आला आहे. आई पिंजऱ्यात आल्यानंतर पिल्लाला व आईला सोबत त्यांच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे.
वन्यप्राणी पाण्याच्या शोधामध्ये फिरत असताना विहिरीमध्ये पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आताच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.