महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे लोकसभाः जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण, कर्मचाऱ्यांना केले साहित्याचे वाटप - मतदान

लोकसभा मतदार संघासाठी २९ एप्रिलला होणाऱ्या मतदानाची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे.

धुळे लोकसभाः जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण, कर्मचाऱ्यांना केले साहित्याचे वाटप

By

Published : Apr 28, 2019, 6:00 PM IST

धुळे - लोकसभा मतदार संघासाठी २९ एप्रिलला होणाऱ्या मतदानाची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. आज रविवारी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी लागणारी मतदान यंत्रे यासह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात या सामुग्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

धुळे लोकसभाः जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण, कर्मचाऱ्यांना केले साहित्याचे वाटप


धुळे लोकसभा मतदार संघासाठी शेवटच्या अर्थात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रासह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. धुळे लोकसभा मतदार संघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. या निवडणुकीसाठी तब्बल १ हजार ९४० मतदान केंद्रांवर मतदान होणार असून धुळे लोकसभा मतदार संघातून १९ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजवणार आहेत.


मतदान प्रक्रियेसाठी साडेअकरा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ६७७ बसच्या माध्यमातून मतदानाचे साहित्य मतदान केंद्रांवर पोहचविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने दिव्यांग मतदारांसाठी वाहनांची सोय केली असून मतदान केंद्रांवर व्हील चेअरची सुविधा देखील ठेवण्यात आली आहे. तसेच उन्हाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा देखील पुरविण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details