धुळे - भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा धुळे शहरात विविध पक्ष संघटनांकडून निषेध नोंदविण्यात आला. भाजपच्या वतीने निषेध करत उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच युवक काँग्रेसच्या वतीने या हल्ल्याचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली.
पुलवामा हल्ला : दहशतवादी हल्ल्याचे धुळ्यात तीव्र पडसाद
भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा धुळे शहरात विविध पक्ष संघटनांकडून निषेध नोंदविण्यात आला. भाजपच्या वतीने निषेध करत उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना निवेदन देण्यात आले.
पुलावामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान हुतात्मा झाले. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहंमद या संघटनेने घेतली आहे. २०० हून अधिक स्फोटकांचा वापर करून हा हल्ला घडविण्यात आला. या घटनेचे संपूर्ण भारतातून तीव्र पडसाद उमटत आहेत. विविध राजकीय आणि सामाजिक संघटना या घटनेचा निषेध करीत आहेत. या हल्ल्याच्या निषेधाचे पडसाद धुळे शहरात देखील उमटले. भाजपच्या वतीने या घटनेचा निषेध करीत, हा हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दशतवाद्यांना धडा शिकवा या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना देण्यात आले.
तसेच या घटनेचा निषेध करीत युवक काँग्रेसच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी केली. हा हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना तत्काळ धडा शिकविण्यात यावा अशी मागणी युवक काँग्रेसने केली. या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर पाकिस्तानविरोधी घोषणांनी तसेच भारत माता कि जय या घोषणांनी दणाणून गेला होता.