धुळे- शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. शेतकरी देखील पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण, नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत
पुरेसा पाऊस न झाल्याने नागरिकांसह जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
संपूर्ण राज्यात दमदार पाऊस सुरू असताना धुळे जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
शेतकरी देखील आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून पिकांसाठी अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे.