धुळे- आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील मालेगाव रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. एकादशी निमित्त मंदिर परिसराला यात्रेच स्वरूप प्राप्त झाले होते.
धुळे : आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी घेतले विठुरायाची दर्शन - आषाढी
आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील मालेगाव रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात महापूजा, भजन, यासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची आषाढी एकादशीला यात्रा भरते. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात. आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील मालेगाव रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात महापूजा, भजन, यासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
धुळे शहरातील हे विठ्ठल मंदिर अतिशय प्राचीन आहे. शहरातील भाविकांचे हे श्रद्धास्थान असून दगडी बांधकाम असलेले हे मंदिर संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. आषाढी एकादशीनिमित्त मंदिर परिसरात विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.