धुळे- शहरात पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त झालेल्या एमआयएमच्या नगरसेवकांनी शहरातील नवरंग पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. पाणी वितरणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे.
धुळ्यात पाण्यासाठी नगरसेवकांचे 'शोले स्टाईल' आंदोलन
धुळे शहरातील विस्कळीत पाणीपुरवठयाला कंटाळून एमआयएमच्या नगरसेवकांनी नवरंग पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
धुळे शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याला कंटाळून एमआयएमच्या नगरसेवकांनी नवरंग पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. नगरसेवक सईद बेग, अब्दुल गणी यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आपली नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला वारंवार सांगूनही पाणी वितरणाच्या व्यवस्थेत सुधारणा होत नाही. वेळेवर पाणी येत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागतो. झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन केल्याचा नगरसेवकांनी सांगितले. पाणी वितरणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास अजून तीव्र आंदोलनाचा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे.
हेही वाचा -लाचखोर महिला लेखापाल एसीबीच्या जाळ्यात, 700 रुपायांची घेतली लाच