धुळे - धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील बाजारपेठ सजली आहे. यंदा होळीच्या सणावर कोरोना विषाणुचे सावट पसरल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर शुकशुकाट पसरला आहे, याचा फटका विक्रेत्यांना बसतोय.
होळीच्या बाजारपेठेवर कोरोना विषाणुचे संकट - कोरोना विषाणु बद्दल बातमी
कोरोना विषाणुचा बाजरपेठेवर परीनाम झाला आहे. यामुळे बाजरपेठेत मोठ्या प्रमाणावर शुकशुकाट पसरला आहे.
होळी आणि धुलिवंदनाचा सण संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, या धुलीवंदनाच्या सणासाठी धुळे शहरातील बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर सजली आहे. बाजारात विविध रंगांसह सजावटीचे साहित्य, मातीचे रंग देखील उपलब्ध झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रंगांच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दरवर्षी नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद यंदा मंदावला असल्याचे पाहायला मिळत आहे. चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांनी यंदा धुलिवंदनाचा सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आहे. यामुळे धुलिवंदनासाठी सजलेल्या बाजारपेठेत दरवर्षीच्या तुलनेत असणारी गर्दी यंदा ओसरल्याच पाहायला मिळत आहे. मातीचे रंग यंदा मोठ्या प्रमाणावर विक्री होणार असल्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला.