धुळे- शहरातील तिरंगा चौक परिसरात राहणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. धुळे शहरातील हिरे महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झालेल्या तिरंगा चौक परिसरातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ४५ वर्षीय व्यक्तीचे शनिवारी नमुने घेण्यात आले होते. त्यांना आठ ते दहा दिवसांपासून सर्दी खोकला व श्वसनाचा त्रास जाणवत होता, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सुर्यवंशी यांनी दिली.
धुळे शहरात आढळला कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण - धुळे संचारबंदी
४५ वर्षीय व्यक्तीचे शनिवारी नमुने घेण्यात आले होते. त्यांना आठ ते दहा दिवसांपासून सर्दी खोकला व श्वसनाचा त्रास जाणवत होता.
धुळे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा कोणाशी संपर्क आला होता का? याची माहिती प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वी धुळे जिल्ह्यातील साक्री येथे एक रुग्ण आढळून आला होता, तर मालेगाव येथील एका महिलेवर धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते़. या दोघांचा मृत्यू झाला आहे़.
Last Updated : Apr 20, 2020, 4:46 PM IST