धुळे- जिल्ह्यात सहा नवे रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील आणखी सहा रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे प्रशासन कडक अंमलबजावणी करीत आहे.
धुळे: कोरोनाबाधितांची संख्या ११५ वर
धुळे शहरामध्ये सहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण संख्या ११५ वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासन कडक अंमलबजावणी करीत आहे.
धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ११५ वर पोहोचली आहे. सहा नवे रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील आणखी सहा रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात धुळे शहरातील तीन, शिरपूर-दोन व साक्री येथील एका रूग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. दरम्यान धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धुळे जिल्हा रुग्णालयात बाहेरगावाहून आलेल्या 13 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत धुळे शहरात 85 रुग्ण आढळून आले असून शहरातील कंटेन्मेंट झोनमध्येदेखील वाढ झाली आहे.