धुळे- सैन्यातील अधिकाऱ्यांकडून होणारा अवमान आणि त्रासाला कंटाळून आपल्याला इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन जवान चंदू चव्हाण याने जिल्हाधिकारी गंगाथरण देवराजन यांच्याकडे दिले आहे.
जवान चंदू चव्हाणने मागितली इच्छामरणाची परवानगी हेही वाचा -शरद पवारांचा वाढदिवस 'बळीराजा कृतज्ञता दिन' म्हणून होणार साजरा
भारताची सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या चंदू चव्हाण याला पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती. तसेच पाकिस्तानच्या तुरुंगात 3 महिने 21 दिवस त्रास सहन केला होता. यानंतर संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानच्या तावडीतून चंदू चव्हाण याची सुटका केली होती. त्यानंतर भारतीय सैन्याच्या न्यायालयाने केलेल्या चौकशीत दोषी ठरवून एकूण 90 दिवसांची शिक्षा जवान चंदू चव्हाण याला सुनावली होती. त्यानंतर त्याला अहमदनगर येथे पाठवण्यात आले होते.
हेही वाचा -तुमचा मुलगाही बेकायदेशीर स्कूल व्हॅनमधून शाळेत जातो का? मग पाहा हा रिपोर्ट
दरम्यान, तेथील अधिकाऱ्यांकडून जवान चंदू चव्हाण याला त्रास होत असल्याचा आरोप चंदू चव्हाण याने केला आहे. त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून सैन्याने माझे वेतन पूर्णपणे बंद केले आहे. यामुळे बोरविहीर येथील माझ्या घरावर असलेले कर्ज फेडू शकत नाही, यामुळे उदरनिर्वाहाच्या प्रश्नामुळे हतबल झालो आहे, सैन्यातील अधिकाऱ्यांकडून होणारा अवमान आणि त्रासामुळे आपण व्यथित झालो आहे. या त्रासाला कंटाळून मी इच्छामरणाचा निर्णय घेतला असून मला ती परवानगी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन चंदू चव्हाण याने जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन यांना दिले आहे.