महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आचारसंहिता लागू असतानाही धुळे बसस्थानकावर झळकणार भाजपच्या जाहिराती

धुळे बसस्थानकावरही भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या जाहिराती प्रसारित करण्यासाठी आयोगाने बंदी घातली होती. मात्र, आता या ठिकाणी पुन्हा एकदा जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

By

Published : Apr 12, 2019, 12:32 PM IST

धुळे बसस्थानक

धुळे- आचारसंहिता लागू असल्यामूळे निवडणूक आयोगाने कोणत्याही पक्षाती जाहिराती सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित घालण्यास बंदी घातली होती. धुळे बसस्थानकावरही भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या जाहिराती प्रसारित करण्यासाठी आयोगाने बंदी घातली होती. मात्र, आता या ठिकाणी पुन्हा एकदा जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

नमो टीव्ही आणि मोदींवरील चित्रपटाची जाहिरात

निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य परिवहन मंडळाला दिले होते. परंतु, धुळे स्थानकावर ओम अॅडव्हर्टायझर्स कंपनीने भाजपच्या जाहिराती लावल्या होत्या. यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्यानंतर कंपनीने न्यायालयात धाव घेतली.

कंपनीने बसस्थानकांवर होर्डिंग्जद्वारे जाहिरात प्रसारित करण्याकरीता १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२० या कालावधीसाठी अधिकृत परवानाधारकाची कागदपत्रे न्यायालयात सादर केली. सोबतच निवडणूक आयोगाच्या परवानगीचे कागदपत्रेही सादर केली. यामुळे जाहिरात प्रदर्शित करण्याचा कंपनीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ओम अॅडव्हर्टायझर्स आणि भाजप यांच्यात जाहिराती प्रदर्शित करण्याचा करार झाला आहे. त्यामुळे आता बसस्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी भाजपच्या जाहिराती प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने याआधी आचारसंहितेचा भंग होवू नये म्हणून मोदींवरील चित्रपट आणि नमो टीव्हीवर बंदी घातली होती. परंतु, निवडणूक आयोगाला बसस्थानकावर प्रदर्शित होणाऱ्या जाहिरातीवर बंदी घालण्यात अपयश आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details