महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरुणांनी महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करावे - कॉ.भालचंद्र कांगो - literature Festival

महाराष्ट्रात विचारवंतांच्या हत्या होत आहेत, या विचारवंतांच्या विचारातून उद्याची पिढी घडायला हवी. तरुणांनी महापुरुषांच्या विचारांनी जीवनाची वाटचाल करावी, असे आवाहन कॉ.भालचंद्र कांगो यांनी केले.

कॉ. भालचंद्र कांगो

By

Published : Jul 14, 2019, 6:43 PM IST

धुळे- अण्णाभाऊ साठेंच्या विचारात परिवर्तनाचा विचार दिसतो. आज हाच विचार पुढे नेण्याची गरज आहे. हे साहित्य संमलेन नसून अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा जागर आहे, असे प्रतिपादन जेष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कॉ. भालचंद्र कांगो यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना केले.

कॉ. भालचंद्र कांगो

पुरोगामी महाराष्ट्रात विचारवंतांची हत्या ही त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे झाली आहे. या प्रश्नांचा सत्ताधारी सरकारला त्रास होत असल्याने आजही मारेकरी सापडत नाही, असे मत कॉ.भालचंद्र कांगो यांनी व्यक्त केले.

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत महापुरुषांचे विचार दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अश्या साहित्य संमलेनाच्या माध्यमातून हे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे,असेही कांगो म्हणाले. धुळे शहरात आयोजित अण्णाभाऊ साठे साहित्य संमलेनाचा रविवारी समारोप करण्यात आल्यानंतर ते बोलत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details