धुळे -तालुक्यातील शिरुड येथे ब्लॅकेट पांघरून आलेल्या चार चोरट्यांनी एटीएम मशीनच पळविल्याची घटना घडली आहे. या मशीनमध्ये १३ लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना रात्री अडीचच्या सुमारास घडली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
चोरट्यांकडून १३ लाखांच्या रोकडसह एटीएम मशिनच लंपास, धुळ्यातील घटना
धुळे तालुक्यातील शिरुड येथे ब्लॅकेट पाघरून आलेल्या चार चोरट्याी एटीएम मशीनची चोरी केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
धुळे तालुक्यातील शिरूड येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीम चोरट्यांनी पिकअप व्हॅन मध्ये टाकून पळवल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यामुळे गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतलं ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी याच एटीएमच्या ठिकाणी चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला होता. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.