धुळे- शहरासह परिसरात एटीएम चोरी होण्याच्या घटना घडत होत्या. धुळे शहरातील साक्री रोड भागात एटीएम मशीन फोडल्याची घटना ताजी असताना कुसुंबा गावात देखील अशीच घटना घडली. या घटनांमधील चोरट्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतलं आहे.
धुळ्यात एटीएम फोडणाऱया तिघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - चोरी
धुळे शहरातील साक्री रोड भागात कॅनरा बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असताना कुसुंबा येथे एसबीआय बँकेचे पासबुक भरण्याचे मशीन एटीएम मशीन समजून चोरटयांनी चोरून नेले होते. मात्र, हे एटीएम मशीन नसल्याचे लक्षात आल्यावर ते मशीन फेकून दिले होते.
धुळे शहरातील साक्री रोड भागात कॅनरा बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असताना कुसुंबा येथे एसबीआय बँकेचे पासबुक भरण्याचे मशीन एटीएम मशीन समजून चोरटयांनी चोरून नेले होते. मात्र, हे एटीएम मशीन नसल्याचे लक्षात आल्यावर ते मशीन फेकून दिले होते. या घटनांमध्ये वाढ होत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तात्काळ तपासचक्रे फिरवत पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत याप्रकरणी ३ जणांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेतील आरोपींचा शोध लागत नव्हता. अश्यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता या दोन्ही घटनांमध्ये लाल रंगाचे बुट वापरणारा एक चोरटा त्यांना आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता चितोड या गावात एक भुरटा चोर लाल रंगाचे बुट वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी विशाल रोहिदास नेवरे (वय २२, रा चितोड, धुळे) याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कबुली दिली. आपल्यासोबत आणखी २ जण यात सामील असल्याची माहिती त्याने दिली. या माहितीनुसार मुस्ताक अय्युब सय्यद (वय २०, रा लळींग ) आणि राहुल प्रकाश मोरे ( वय २० रा तिखी, ता जि धुळे ) यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. यांच्याकडून या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, एक कुऱ्हाड आणि एक गावठी बनावटीचे पिस्तूल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. :