धुळे- लोकसभा निवडणुकीपूर्वी धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर आज (बुधवार) हा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. गोटे यांचा राजीनामा स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाविरुद्ध बंडखोरी करत उमेदवारी केली होती. धुळे महापालिका निवडणुकीपासून अनिल गोटे हे नाराज होते. लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला होता. तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा देखील त्यांनी राजीनामा दिला होता. भाजपनेदेखील त्यांच्यावर कारवाई करत त्यांची हकालपट्टी केली होती. मात्र, आता विधानसभा अध्यक्षांनी देखील अनिल गोटे यांचा राजीनामा स्वीकारला आहे.