महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदूर एअरपोर्टवरच्या विमानातील बॉक्समध्ये पैसेच; अनिल गोटेंचा दावा - lok sabha

या बॉक्स'मध्ये कपडे किंवा फळे देखील असू शकतात, असा दावा डॉ. भामरेंनी केला आहे. या व्हिडिओबाबत अनिल गोटे यांनी ईटीव्ही भारतला प्रतिक्रिया दिली असून अनिल गोटे म्हणाले, बॉक्स मध्ये फळ किंवा कपडे असतील तर ते इतके सिलबंद का करण्यात आले, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

गोंदूर एअरपोर्टवरच्या विमानातील बॉक्समध्ये पैसेच; अनिल गोटेंचा दावा

By

Published : Apr 27, 2019, 3:00 PM IST

धुळे- शहराजवळील गोंदूर विमानतळावर विमानातून काही बॉक्स उतरवितानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मंत्री सुरेश प्रभू यांच्या विमानातून हे बॉक्स उतरविले गेल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, अशी माहिती अनिल गोटे यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली.

धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी सुरेश प्रभू हे २ दिवसांपूर्वी धुळे दौऱ्यावर आले होते. सुरेश प्रभू यांच्या दौऱ्यानंतर धुळे शहराजवळील गोंदूर विमानतळावर विमानातून काही बॉक्स उतरविले जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओबाबत विरोधकांकडून प्रचंड टीका होत असून सुरेश प्रभू यांच्या विमानातून पैसे आले आहेत, असा आरोप केला जात आहे.

गोंदूर एअरपोर्टवरच्या विमानातील बॉक्समध्ये पैसेच; अनिल गोटेंचा दावा

या बॉक्स'मध्ये कपडे किंवा फळे देखील असू शकतात, असा अजब दावा डॉ. भामरेंनी केला आहे. या व्हिडिओबाबत अनिल गोटे यांनी ईटीव्ही भारतला प्रतिक्रिया दिली असून अनिल गोटे म्हणाले, बॉक्स मध्ये फळ किंवा कपडे असतील तर ते इतके सिलबंद का करण्यात आले, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. या व्हिडिओ बाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून याची चौकशी केली जावी, अशी मागणी अनिल गोटे यांनी केली आहे. यावर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे बघणे महत्वाचे असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details