धुळे -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि माजी शिक्षणमंत्री अमरीश पटेल यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी देखील प्रवेश केला आहे.
धुळे : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमरीश पटेल यांचा भाजप प्रवेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि माजी शिक्षणमंत्री अमरीश पटेल यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमरीश पटेल यांचा भाजप प्रवेश
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात बंडखोरीमुळे बदलणार राजकीय समीकरणे
अमरीश पटेल आणि शिवाजी दहिते यांच्या भाजप प्रवेशामुळे धुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे प्रभावित होऊन आपण हा प्रवेश करत असल्याचे अमरीश पटेल यांनी यावेळी सांगितले. पटेल हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आळखले जातात.