धुळे - शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय संविधान संरक्षण समितीच्या वतीने संभाजी भिडे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संभाजी भिडेंविरोधात धुळ्यात आंदोलन
धुळ्यात संभाजी भिडेंच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यांनी गौतम बुद्ध यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत झालेल्या कार्यक्रमात भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची जगाला गरज असल्याचे सांगितले होते. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर संभाजी भिडे यांनी टीका करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याचा भारतीय संविधान संरक्षण समितीच्या वतीने निषेध व्यक्त करत संभाजी भिडे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भगवान गौतम बुद्ध यांच्या विषयी अनुद्गार काढणाऱ्या संभाजी भिडे त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.