धुळे -जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर धुळे तालुक्यातील फागणे येथील हर्षदा छाजेड या विद्यार्थिनीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएसएस अर्थात भारतीय सांख्यिकी विभागाची परीक्षा पास केली आहे. या परीक्षेत तिने देशातून चौथा तर राज्यातून प्रथम क्रमांक पकवला आहे. कुटुंबाच्या सहकार्यामुळेच आपण हे यश प्राप्त केले, अशी प्रतिक्रिया हर्षदा हिने व्यक्त केली.
प्रतिक्रिया देताना हर्षदा छाजेड आणि तिचे काका हेही वाचा -मदत देणारे मुख्यमंत्री, अजूनपर्यंत पूरग्रस्तांना मदत का मिळाली नाही; आशिष शेलार यांचा सवाल
आयएसएस या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, हर्षदा या परीक्षेत पास होणारी धुळे जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे. हर्षदाने 2018 साली पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरवले. तिचे पदवीचे शिक्षण धुळे शहरातील झेड बी पाटील महाविद्यालयातून पूर्ण झाले असून पदव्युत्तर शिक्षण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून झाले आहे. तिने एमएससी गणित या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून विद्यापीठातून सुवर्ण पदक मिळवले आहे.
2018 साली हर्षदाने सर्वप्रथम यूपीएससी परीक्षा दिली होती. मात्र, त्यावेळी मुलाखतीत तिला यश मिळाले नाही. मात्र, या अपयशानंतर खचून न जाता तिने पुन्हा एकदा जोमाने अभ्यास सुरू करून हे यश संपादन केले. हर्षदाच्या वडिलांचे 2015 साली निधन झाले होते. हर्षदाच्या काकांनी तिचा सांभाळ करत तिचे शिक्षण पूर्ण केले. या मिळालेल्या यशात काका-काकू, तसेच भावांचे मोठे योगदान आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना येणाऱ्या अपयशातून शिकत जाऊन यश संपादन करण्याचा सल्ला हर्षदाने दिला.
हेही वाचा -हुतात्मा निलेश महाजन यांचे सोनगीर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार