धुळे - जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आला.
धुळ्यात स्वातंत्र्यदिन साजरा; पालकमंत्री भुसेंच्या हस्ते ध्वजारोहण - पालकमंत्री भुसे
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी देवराजन गंगाथरन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वामंती सी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिनाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी देवराजन गंगाथरन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वामंती सी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री दादा भुसे म्हणाले
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. गेल्या 5 वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे पालकमंत्री भुसे म्हणाले. तसेच त्यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.