धुळे - देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सला अपघात झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील सांगवीजवळ घडली. या अपघातात ३० ते ३५ जण जखमी झाले असून ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर शिरपूर ग्रामीण रुग्णालयासह धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; ३५ जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर
मध्य प्रदेशच्या इंदूर येथील पाहुजा कुटुंब 'रॉयल' ट्रॅव्हल्सने देवदर्शनासाठी निघाले होते. या गाडीने दुपारी ४ च्या सुमारास सांगवीतील 'नमोश्री' पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या कंटेनर मागून धडक दिली. या बसमध्ये जवळपास ५५ ते ६० भाविक प्रवास करत होते.
हेही वाचा -हिंगणघाटची पुनरावृत्ती : लासलगाव बस स्थानकात महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
मध्य प्रदेशच्या इंदूर येथील पाहुजा कुटुंब 'रॉयल' ट्रॅव्हल्सने देवदर्शनासाठी निघाले होते. या गाडीने दुपारी ४ च्या सुमारास सांगवीतील 'नमोश्री' पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली. या बसमध्ये जवळपास ५५ ते ६० भाविक प्रवास करत होते. या दूर्घटनेतील जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्णालयात पत्रकार, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते मदत कार्य राबवत आहेत.